‘एकते’ची संस्कृती गाणारी उर्दू ही भाषा हिंदू आणि मुस्लीम या दोन प्रमुख धर्मांत अंतर निर्माण करणारी ठरली, त्याला भाषेचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण कारणीभूत आहे!

एकेकाळी देशभरातील जनसामान्यांची संपर्क भाषा असलेल्या ‘उर्दू’ला आज भारतीय विद्यापीठ परकीय भाषा मानत आहे. एकतेची संस्कृती गाणारी ही भाषा हिंदू आणि मुस्लीम या दोन प्रमुख धर्मांत अंतर निर्माण करणारी ठरली आहे. अर्थात त्याला भाषेचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणच कारणीभूत आहे. त्यामुळे उर्दूचे खच्चीकरण झाले व होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत या भाषेबद्दलची गृहितकेही बदलत आहेत.......

पुरोगामी, सुधारणावादी विचारवंतांना मुस्लीम समाज हळूहळू बदलत आहे आणि तो आधुनिक बनेल, अशा विश्वास होता. मात्र तो आज तसा झाल्याचे दिसत नाही

हिंदू-मुस्लीम प्रश्न प्रामुख्याने राजकीय हेतूने हाताळला गेला. त्यामुळे ‘समान नागरी कायदा’, धर्मनिरपेक्षता आदी निकषांच्या आड मुस्लीम धर्मातील चालीरिती आणि ‘शरिया कायदा’ ही अंतर्गत बाब असून त्यात कोणी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली. समाजातून या सुधारणांसाठी फारसा प्रयत्न न झाल्याने राजकीय पातळीवर त्यासाठी दबाव निर्माण झाला नाही आणि मुस्लिमांना दुखवायचे नाही, अशीच भूमिका राजकीय पक्षांनी घेतली.......

इस्लामची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी महिलांनी हिजाब परिधान करायला सुरुवात केली, पण तो अधिकाधिक मुस्लीम समुदायाशी जोडले जाण्याचे प्रतीक म्हणूनही प्रस्थापित झाला…

हिजाब हा प्रतिगामी आहे, धार्मिक आहे असे ज्या पुरोगामी आणि आधुनिक शिक्षक, अधिकारी, आमदार, मंत्री यांना वाटते, त्यांनी इतरांना त्यांच्यासारखे प्रगत बनण्यासाठी त्यांना आधी हिजाब घेऊन शिकू द्यावे. दुसरे असे की मुस्लीम मुलींनी, तेही काही, डोक्यावर हिजाब घेतल्याने बहुसंख्य हिंदू शिक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावता येणार नाही, अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नाही.......